उंडील नरवाडी त डोंगर खचला

उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या दक्षतेनंतर प्रशासनाने घेतली दखल

तळेरे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे देवगड तालुक्यातील उंडील गावातील नरवाडी भागातील ब्राम्हणवाडी रस्त्यालगत डोंगर खचला असून उपसरपंच जयेश अशोक नर यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तहसीलदार रमेश पवार यांना मोबाईलवरून घटनेची कल्पना दिली.त्यानंतर तहसीलदार पवार यांनी तात्काळ मंडळ अधिकारी व तलाठी याना घटनास्थळी जाऊन पाहणीचे आदेश दिले. त्यानुसार मंडळ अधिकारी अशोक सावंत, तलाठी श्रीमती मेस्त्री यांनी पाहणी केली. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर, माजी उपसरपंच भालचंद्र मांजरेकर, सरपंच श्रीमती यादव, पोलीस पाटील जयवंती नर, नरवाडी तील ग्रामस्थ साधना नर, लवू नर, राजाराम मांजरेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!