उंडिल नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता बांधून घ्यावा – उपसरपंच जयेश अशोक नर यांची मागणी

तळेरे( प्रतिनिधी) : 5 लाख निधी खर्चून खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेला देवगड तालुक्यातील उंडील नरवाडी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे 5 लाख निधी खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर, माजी उपसरपंच भालचंद्र मांजरेकर, सरपंच श्रीमती यादव, पोलीस पाटील जयवंती नर, स्थानिक ग्रामस्थ लवू नर, नाना नर, हरिश्चंद्र नर, राजाराम मांजरेकर यांनी केली. निकृष्ट दर्जाच्या या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला.दायित्व कालावधीत हा रस्ता असल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा या रस्त्याचे काम करून घेण्याची मागणी उंडिल उपसरपंच जयेश अशोक नर यांनी केली आहे.

error: Content is protected !!