धामापूर श्री देव मोरेश्वर गणपती मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. रोख रक्कम केली लंपास

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल गुरुवार दिनांक २७ रोजी रात्री फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. आज सकाळी मंदिरात नित्यपुजेसाठी श्री नितीन सातार्डेकर गेले असता मंदिरातील दानपेटी कटावणीच्या सहाय्याने उघडून त्यातील रोख रक्कम चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी याची माहिती श्री बंड्या राउळ आणि पोलीस पाटील विनायक प्रभु यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील श्री. प्रभु , आणि श्री. राऊळ यांनी मंदिरात येउन फोडलेल्या दानपेटीची पाहणी केली.

error: Content is protected !!