सिंधुदुर्ग -कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर कोल्हापूर-बालिंगा पूल अवजड वाहतूकीस खुला

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कोल्हापूर यांचे आदेश जारी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आठवडाभरापूर्वी कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने कोल्हापूर-बालिंगा पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. अखेर रविवारी सायंकाळी हा मार्ग अवजड वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. यासंबधीचे परिपत्रक राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कोल्हापूर यांनी जारी केले आहेत.आठवडाभरापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीसदृश्य पाऊस बरसत होता. दरम्यान भोगावती नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने बालिंगा पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. अखेर रविवारी सायंकाळी प्रशासनाने बालिंगा पुलावरील वाहतूक अवजड वाहतूकीला खुली करण्यात आली आहे. त्यामुळे एस.टी. मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यासंबंधीचे परिपत्रक राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कोल्हापूर यांनी जारी केले.

error: Content is protected !!