होय, तुळशीदास रावराणे, मनोज रावराणेंनीच नवीन कुर्ली ग्रामपंचायत ला विरोध केला – अनंत पिळणकर

पत्रकार परिषदेत लोरे ग्रामपंचायत चे ठराव केले सादर

कणकवली (प्रतिनिधी) : देवघर धरणग्रस्तांचे लोरे आणि फोंडाघाट माळरानावर पुनर्वसन झाले. 1989 पासून आमच्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आमचा गाव नाही आहे.नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष म्हणून गेली 14 वर्षे मी बीडीओ , जि प सीईओ, कोकण आयुक्त, मंत्रालय पर्यंत मी स्वतंत्र ग्रामपंचायत चा प्रस्ताव करून पाठपुरावा करत आहे. नविन कुर्ली ग्रामपंचायत ची स्वतंत्र ग्रामपंचायत आता अंतिम टप्प्यात असून यावरून सध्या राजकीय श्रेयवाद सुरू आहे. आजवर कोणाकडूनही 1 रुपयाचीही वर्गणी अथवा आर्थिक मदत न घेता मी स्वखर्चाने ग्रामपंचायत निर्मितीसाठी अथक मेहनत घेत आहे. माझा गाव हे माझे कुटुंब म्हणून हे काम करत आहे.गेली 30 वर्षे जिल्हा परिषदवर राणेंची सत्ता आहे. मात्र या काळात केवळ राजकारणासाठी मतदान पुरते आमच्या गावाचा वापर केला गेला. प्रशासकीय राजवट असल्यामुळे विद्यमान सीईओ प्रजित नायर आणि डेप्युटी सीईओ विशाल तनपुरे यांनी नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत चा परिपूर्ण प्रस्ताव 9 फेब्रुवारी 2023 मार्च रोजी कोकण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आणि यानंतर मार्च 2023 मध्ये हा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे कोकण आयुक्तांनी पाठवला. आता ग्रामपंचायत होणार हे कळल्यानंतर फक्त राजकीय श्रेयवाद घेण्यासाठी प्रत्येक जण ग्रामपंचायत आम्हीच केली असे म्हणू लागलेत.शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी गावात ग्रामपंचायत मान्यता मिळाल्याची फसवी माहिती देत मिरवणूक सुद्धा काढली. त्यांनतर शिवसेनेच्या वर्धापनदीन साठी गर्दी दाखवण्यासाठी आमच्या गावातील लोकांना नवीन ग्रामपंचायत मान्य झाल्याचे फसवून नेल्याची टीकाही पिपणकर यांनी केली. कणकवली पं स चे माजी सभापती मनोज रावराणे यांच्या वडिलांनी 3 जुलै 2012 रोजी लोरे नं 1 ग्रामपंचायत चा ठराव क्र.8 नुसार नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत होऊ नये असा ठराव तत्कालीन सरपंच तुळशीदास रावराणे यांनी घेतला असल्याचे लेखी पुरावाच अनंत पिळणकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. तसेच 26 फेब्रुवारी 2013 च्या लोरे ग्रा प च्या ठरावानुसार मनोज रावराणे सूचक असलेल्या ठरावात नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीला विरोध केला आहे याचा पिळणकर यांनी लेखी पुरावा सादर केला.एकीकडे ग्रामपंचायत ला लेखी ठराव करून विरोध करणारे मनोज रावराणे दुसरीकडे दिखाऊपणा करत स्वतंत्र ग्रामपंचायत साठी उपोषणाला बसतात. हस खोटेपणा कशासाठी ? असा सवालही पिळणकर यांनी केला. जेव्हा आमच्या गावची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण होईल तेव्हा आमच्या गावात राजकीय वर्चस्व असल्याचे मनोज रावराणेंचे राजकीय थोतांड उघड करण्याचा इशारा पिळणकर यांनी दिला. माझ्याकडे पुरावे मागितलात तर एवढे पुरावे देईन की पळताभुई थोडी होईल असे पिळणकर यांनी ठणकावून सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नयन गावडे, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!