कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष
कुडाळ (अमोल गोसावी ) : राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्यासाठी करोडो रुपये खर्च करते. त्याचा उपयोग नागरिकांना होतो का ? हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांचा फैलावर होत आहे. ताप, खोकला, सर्दी, डेंग्यू, मलेरिया अशाप्रकारच्या रुग्णांवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी औषधेही शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे. तर सध्या रुग्णालयात सुई उपलब्ध नसल्याने रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जाते. तर कुडाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असून टीटी इंजेक्शन, अँटोबायोटिक औषधे पेशंटला द्यावी लागतात. त्याला लागणारी सिरीज सलाईन योग्य प्रमाणात मागवणे हे बंधनकारक असते. परंतु, कुडाळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये त्याची कमतरता भासत आहे.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये शनिवारी बरेचशे पेशंट तपासणी करण्यासाठी आले होते. या पेशंटना बाहेरून सलाईन लावण्यासाठी सुई आणावी लागली. या रुग्णालयामध्ये सुईसह औषधेही उपलब्ध नसल्याची बाब कुडाळचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शिरसाट यांना समजली. त्यानंतर याची तत्काळ दखल घेत सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी या रुग्णालयात तातडीने भेट देऊन डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांना लागणाऱ्या औषधांचा तत्काळ पुरवठा करावा. यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी डॉ. पाटील यांनी तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची तसेच नर्स व औषध विभागाशी संपर्क साधून जी औषधे उपलब्ध नाहीत ती सर्व आपल्याकडे यादी पाठवून द्यावी. आपण तत्काळ पाठवून देतो असे सांगितले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुळे तसेच डॉ. तुषार गवस उपस्थित होते. यावेळी शिरसाट यांनी डॉ. पाटील यांचे आभार मानले.
तसेच स्थानिक राजकारणी नेते मंडळींनी यासाठी वेळ देणे व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, असे प्रसाद शिरसाट यांनी स्पष्ट केले.











