केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून धामापुर तलावाची जल वारसा स्थळाची वृक्षारोपणासाठी निवड

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ

चौके (अमोल गोसावी) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील जल वारसा स्थळांची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलाव या जल वारसा स्थळामध्ये समावेश झाला असून या ठिकाणी सोमवार ३१ जुलै रोजी पर्यटन मंत्रालय, पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर परिसरात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारभं करण्यात आला सदर कार्यक्रम करत असताना केंद्र व राज्य सरकारच्या मुख्य उद्धेशानुसार स्थानिक भागातील शालेय युवा विद्यार्थी वर्गास स्थानिक भागातील पर्यावरण व पर्यावरण संबंधी माहिती व्हावी या उद्धेशाने काळसे हायस्कूल व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कनिष्ठ महाविद्यालय काळसे मधील 25 विद्यार्थी , शिक्षक यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर, धामापूर सरपंच सौ. मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर , श्री महेश परब , प्रा. महेश धामापूरकर शिक्षक महेंद्र चव्हाण , रुपेश जाधव ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!