खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने श्रीम अर्चना तळगावकर व श्री संजय राऊळ यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर व शिक्षक संजय राऊळ यांची प्रशासकीय बदली दुसऱ्या शाळेत झाल्यामुळे केंद्र शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सदिच्छा समारंभात या दोन्ही शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी व. समिती सदस्य गुरूप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे समिती सदस्य समीक्षा शेट्ये,संध्या पोरे तसेच खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ व शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी खारेपाटण केंद्र शाळेत सुमारे ९ वर्षे आपली प्रामाणिक सेवा पार पडली असून शालेय विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून देखील प्रसिद्ध होते.शाळेच्या कोणत्याही कामात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असायचा. यावेळी संजय राऊळ सर यांनी शाळेला ७०००/- रुपये एवढी रक्कम शाळेला भेट म्हणून दिली. “खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना शिस्त व आदर मिळाला. तसेच गावातील नागरिक आणि पालकवर्ग यांनी आम्हाला दिलेले प्रेम आपुलकी आम्ही कधीच विसरू शकणार नाही असे भावपूर्ण उद् गार संजय राऊळ व अर्चना तळगावकर यांनी काढले. यावेळी शाळेच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी,शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी,रुपाली पारकर,अलका मोरे, आरती जोजन,अमृता ब्रम्हदंडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत दोन्ही शिक्षकांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले.

error: Content is protected !!