भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट

कुडाळ-मालवण तालुक्यातील विकासकामांबाबत केली चर्चा

कुडाळ (अमोल गोसावी) : भाजपा नेते निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुबंई मंत्रालय येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाल्याची माहिती निलेश राणे यांनी ट्विटर द्वारे दिली.

निलेश राणे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून कुडाळ मालवण मतदारसंघात कार्यरत आहेत. नुकतेच जनसंपर्क अभियान राबवून निलेश राणे यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील गावा खेड्यात जात कार्यकर्त्यांशी संपर्क करत संघटना वाढीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे व याच पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा येईल याकडेही निलेश राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निलेश राणे यांनी विकासनिधीची मागणी केली होती.

error: Content is protected !!