खारेपाटण (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री आपल्याच पक्षाचे असूनही शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुख तथा रामेश्वरनगर शाळा सुधार समिती अध्यक्ष मंगेश गुरव याना शाळा बंद आंदोलनाचा इशारा द्यावा लागत असेल तर हे त्यांच्याच शिक्षणमंत्र्यांचे अपयश असल्याची टीका खारेपाटण येथील नागरिक अनिकेत जामसंडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. खारेपाटण रामेश्वर नगर येथील शाळेत एक शिक्षक कार्यरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल मंगेश गुरव यांनी 3 ऑगस्ट पासून शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यावर टीका करताना अनिकेत जामसंडेकर यांनी म्हटले आहे की राज्याचे शिक्षणमंत्री आपल्याच शिवसेना पक्षाचे आहेत. असे असताना शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख असलेल्या मंगेश गुरव याना शाळेत शिक्षक मिळण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते हे त्यांचे अपयश असल्याची टीका जामसंडेकर यांनी केली आहे.
शिक्षणमंत्री शिवसेनेचे असताना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव ना आंदोलन करावे लागणे हे त्यांचेच अपयश – अनिकेत जामसंडेकर












