तरंदळे शाळा नं 1 येथील विद्यार्थ्यांना माेफत वाह्या वाटप

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गाेट्या सावंत यांची उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : शाळा तरंदळे नं 1 येथे युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने माजी जि.प.अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष,संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शाळेतील मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून करण्यात आली.त्यानंतर संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे स्वागत सरपंच सुशिल कदम यांनी केलं,सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांचे स्वागत माजी सरपंच सुधीर सावंत यांनी केले,सामाजिक कार्यकर्ते राजू हिरलेकर यांचं स्वागत माजी सरपंच राजेश फाटक यांनी केलं.तरंदळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमाकांत देवलकर यांचं स्वागत माजी उपसरपंच संदेश सावंत यांनी केलं.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक तळदेवकर सर यांनी केलं.सरपंच सुशिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संदेश उर्फ गोट्या सावंत साहेब,संदीप सावंत,राजू हिर्लेकर,सुधीर सावंत,राजेश फाटक,रमाकांत देवलकर,शिक्षक वर्ग यांचे स्वागत ही केले व आभार ही मानले.सरपंच सुशिल कदम म्हणाले सावंत साहेब यांचं शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण काम आहे.महाराष्ट्र मध्ये युवा संदेश च नाव त्यांच्या कामगिरीवर गाजतय.युवा संदेश चे अनेक उपक्रम हे प्रेरणा देणारे असतात.मुलांना घडविणारे असतात.सावंत यांच्या अथक परिश्रमा मुळेच शाळा नंबर एक च काम दर्जेदार करता आले.आणि ह्याच आम्हाला सर्वांना अभिमान असेल.संदेश उर्फ गोट्या सावंत आपल्या भाषणात म्हणाले की युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित अनेक उपक्रम राबविले जातात,आणि ह्या पुढेही अधिक गतीने अनेक उपक्रम राबविले जातील.

मोफत वह्या वाटप कार्यक्रमासाठी संदेश सावंत संदीप सावंत,राजू हीर्लेकर,सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच सुधीर सावंत, माजी सरपंच राजेश फाटक,माजी उपसरपंच संदेश सावंत,माजी ग्रामपंचायत सदस्य देवा रावले,सदस्य सूनीलदत्त जाधव,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमाकांत देवलकर,गणेश मुंबरकर,मुख्याध्यापक पोखळे सर, तळदेवकर सर,डोईफोडे सर,कांबळी सर,अंगणवाडी शिक्षिका शितल सावंत व पालकवर्ग मुले उपस्थित होते.

error: Content is protected !!