निलेश राणे यांच्या प्रयत्नाने कुडाळ मालवण मधील विकास कामांवरील स्थगिती उठली

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी खा. निलेश राणे यांनी मानले आभार

कुडाळ (अमोल गोसावी) : महाविकास आघाडी सरकारने कुडाळ व मालवण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थगिती आणलेल्या विकास कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ पाठपुरावा केला असता २ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे असे भाजपचे कुडाळ व मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सांगून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृह येथे भाजपचे विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू , जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, विशाल परब, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा चिटणीस विनायक राणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, मोहन सावंत आदी उपस्थित होते
     
यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की, मालवण विधानसभा मतदार संघातील जी विकास कामांची यादी १ एप्रिल २०२१ तयार झाली होती त्या कामांच्या तसेच राज्यातील इतर ब-याच कामांना त्यावेळच्या सरकारने स्थगिती दिली होती. आता सरकार बदलले, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आले व या शिंदे फडणवीस सरकारने ज्या जुन्या विकास कामांना स्थगिती मागच्या सरकारने दिली होती त्या सर्व कामांची स्थगिती उठवली आहे. या मध्ये मी जी विकास कामांची यादी दिली होती त्यापैकी  २ कोटी ५९ लाख रूपयांच्या कामांची स्थगिती उठवली त्या बद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानत असल्याचे राणे यांनी सांगितले.

या यादीतील ५० टक्के कामे मंजूर आहेत तर काही कामे तांत्रिक कारणास्तव मंजुर करायची राहीली आहेत. येणाऱ्या काळात या मतदार संघाला कधीही न मिळालेला भरघोस निधी  आणणार असे सांगितले

error: Content is protected !!