कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ दिवाणी न्यायालय येथे दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशाचे अनुसरुन राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील लोक अदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच विज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था तसेच ग्रामपंचायती यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त वादपूर्व प्रकरणे दाखल करून जास्तीत जास्त प्रकरणे मिठविण्यात यावीत. तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांस न्यायालयात प्रलंबित प्रकरणामध्ये लोकअदालतपूर्व आपल्या प्रकारणांची बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्याच्या करीता दि. १ ऑगस्ट २०२३ पासून कार्यालयीन दिवशी दुपारी ०२ ते ०२.३० वाजता वेळ देण्यात येणार आहे. त्याकरीता संबंधीतांनी दिवाणी न्यायालय कुडाळ येथे संपर्क साधावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश ए. जे. बाचुलकर व सह दिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे यांनी केले आहे.
कुडाळ येथे ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत












