काळसेच्या सिद्धी राजेंद्र परबने पटकावले सुवर्णपदक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( एम. ए. मराठी साहित्य ) प्रथम

काळसे हायस्कूल तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळची माजी विद्यार्थीनी

कुडाळ (अमोल गोसावी) : श्री. शिवाजी विद्यामंदिर काळसे तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थीनी कुमारी सिद्धी राजेंद्र परब हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( एम. ए. मराठी साहित्य ) प्रथम येत सुवर्णपदक पटकावले. तसेच अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी सेट परीक्षाही ती नुकतीच उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तीचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. काळसे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. राजेंद्र परब यांची ती कन्या आहे. सिद्धीच्या यशाबद्दल काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सी. ए. हेमंत परब व सर्व संस्था पदाधिकारी , माजी विद्यार्थी संसथेचे अध्यक्ष तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी श्री. विनोद गोसावी आणि प्रशालेचे मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , सर्व शिक्षक यांनी तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे , क. म. शि. प्र. मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरयू आसोलकर , प्रा. संतोष वालावलकर , आदीनी तिचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!