फोंडाघाट मधील विश्वास रेवडेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): फोंडाघाट हवेली नगर येथील विश्वास(पांडुरंग) मनोहर रेवडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फोंडाघाट पंचक्रोशी ते ‘तात्या’ या नावाने परिचित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात ते चालक म्हणून निवृत्त झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेच्या यशस्वी उद्योजक म्हणून गतवर्षी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला होता.अतिशय कडक शिस्तीचा स्वभाव ही त्याची विशेष ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार विशाल रेवडेकर यांचे ते काका होत.

error: Content is protected !!