बापर्डे येथील महिलेचा वहाळात सडलेल्या स्थितीत मृतदेह
टेंबवली येथील महिलेचा मळई खाडीकिनारी मृतदेह
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात रविवार हा दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडवून देणारा ठरला.बापर्डे येथील बेपत्ता महिला प्रतिभा दुसरणकर(५५) हीचा मृतदेह तेथिलच डोकांबा वहाळात सडलेल्या स्थितीत सापडला तर टेंबवली येथील शनिवारी दुपारी टेंबवली येथून बेपत्ता झालेल्या प्रतिभा प्रदीप बापर्डेकर(५०) या महिलेचा मृतदेह मळई खाडीकिनारी सापडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार , सुमारे १५ दिवसापुर्वी बापर्डे येथील घरातून बेपत्ता झालेल्या प्रतिभा प्रकाश दुसणकर(५५) या महिलेचा सडलेल्या स्थितीत मृतदेह रविवारी सकाळी बापर्डे डोेकांबा व्हाळाच्या पाण्यात सापडला आहे. बापर्डे हेदाडवाडी येथील प्रतिभा प्रकाश दुसणकर या महिलेची मनस्थिती बिघडलेली होती याच स्थितीत २२ जुलै रोजी सकाळी ७.३० वा.सुमारास ती घरातून निघून गेली.तिचा मुलगा बाळकृष्ण दुसणकर यांनी शोधाशोध केली मात्र आपल्या आईचा शोध न लागल्याने त्यांनी देवगड पोलिस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
रविवारी सकाळी बाळकृष्ण हा आईचा शोध घेत असताना बापर्डे डोेकांबा व्हाळाकडे त्यांना कुजकट वास येवू लागल्याने त्यांनी पाण्याचा दिशेने जावून बघितले यावेळी पाण्यात सडलेल्या स्थितीत एका महिलेचा मृतदेह दिसला. दरम्यान टेंबवली गावठणवाडी येथील प्रतिभा प्रदीप बापर्डेकर(५०) ही महिला शनिवारी दुपारी ३ वा.सुमारास घरातून बाहेर पडून कामानिमित्त गेली होती.घरात तिचे पती होते तर मुलगाही कामाला गेला होता.सायंकाळी घरी कामावरून आल्यानंतर आई दिसली नाही.ती कुठेतरी कामाला गेली असेल म्हणून वाट पाहीली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी आली नाही म्हणून शोधाशोध केली.ती सापडली नाही म्हणून दुसèया दिवशी रविवारी सकाळीही शोधाशोध केली दरम्यान रविवारी सकाळी ११ वा.सुमारास मळई येथील माजी नगरसेवक उमेश कणेरकर यांनी देवगड पोलिस स्टेशनला मळई खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह पाण्याबरोबर तरंगत आला असल्याचे सांगीतले.तात्काळ पोलिस उपनिरिक्षिक जितेंद्र कांबळी, पोलिस हवालदार उदय शिरगांवकर, महिला पोलिस नाईक कविता लाड, पो.कॉ.निलेश पाटील, विशाल वैजल यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व आईचा शोध घेण्यासाठी आलेल्या तुषार बापर्डेकर याला मृतदेह दाखविण्यात आला यावेळी त्यांनी आईचाच मृतदेह असल्याची खात्री पटली.त्यानंतर पोलिसांनी खबर घेवून आकस्मिक मृत्युची नोंद केली.