कणकवली (प्रतिनिधी): कलमठ बीडयेवाडी येथील मनोरमा पार्कचे मालक जे जे ऑफ स्कूलचे निवृत्त प्राध्यापक, उत्कृष्ट चित्रकार रमाकांत शंकर राणे वय (६७) यांचे शनिवारी रात्री ९ वाजता कणकवली येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले कलमठ बिडयेवाडी येथे रमाकांत शंकर राणे यांनी अथक परिश्रम घेत मनोरमा पार्कची उभारणी केली आहे गावातील एक चांगली निवासी वसाहत निर्माण केली आहे. गावातील सामाजिक कामांमध्ये ते पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी नेहमी जोपासायचे हसतमुख चेहरा होता त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे तसेच बांधकाम व्यवसायिक ऋत्विज राणे यांचे ते वडील होते.
मनोरमा पार्कचे सर्वेसर्वा रमाकांत राणे यांचे निधन












