साळेल येथे कृषीकन्यांनी साकारले कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र!

चौके (अमोल गोसावी) : ग्रामीण उद्यानविद्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत साळेल येथे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी शेतीच्या अभ्यासासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. उपक्रमांतर्गत गिरोबा रंगमंच साळेल येथे या विद्यार्थिनींनी गावातील शेतकऱ्यांसाठी अनोखे असे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र उभारले आहे. या माहिती केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला प्रा. डॉ. उईके, गावचे सरपंच रविंद्र सहदेव साळकर व उपसरपंच लक्ष्मण परब, प्रगतशील शेतकरी कमलाकर गावडे, भानजी गावडे, विजय गावडे, नारायण गावडे, सुहास बेलवलकर आधी उपस्थित होते. सरपंच रवींद्र साळकर यांनी फीत कापून माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन केले. प्रगतशील शेतकरी कमलाकर गावडे, भानजी गावडे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमारी स्नेहल कदम, सायली परब, सेजल जाधव, दिव्याक्षी सावंत, कोमल कावले, अदीना ओरलाक्कोट यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!