कुडाळ (अमोल गोसावी) : शिवसेना युवासेना आंबडपाल व युवा फोरम सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युवासेना प्रवक्ते यशवर्धन राणे यांच्या सौजन्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबडपाल येथे मुलांचे डोळे तपासणी शिबिर आणि अंगणवाडीला सतरंजी वाटप कार्यक्रम पार पडला. युवासेना प्रवक्ते यशवर्धन राणे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी आंबडपाल उपसरपंच धीरेंद्र चव्हाण, शाखा प्रमूख विष्णू वंजारे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, युवासेनेचे प्रथमेश वंजारे, शुभम सिंदगिकर, शुभम मेस्त्री, डॉ. गद्रे यांनी टीम तसेच पालक उपस्थित होते.
उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबडपाल शाळा येथे मुलांचे नेत्र तपासणी शिबिर संपन्न












