लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या, कॉयर विभागाच्या वतीने आयोजन
कुडाळ (अमोल गोसावी) : भारत सरकारच्या लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या कॉयर बोर्डच्या माध्यमातून आज कुडाळ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भडगाव बुद्रुक येथे उद्योजकता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम पुढील दोन दिवस चालणार असून शेवटच्या दिवशी या कार्यक्रमात सहभागी असलेल्या महिलांना अभ्यास दौऱ्याचे देखील आयोजन करण्यात आल आहे. आजच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमासाठी कॉयर बोर्डाचे झोनल ऑफिसर श्रीनिवास बिट्टीलिंगु, श्री. भोई, सौ. सारखे, भडगाव ग्रामपंचायत प्रशासक श्री, खरात, ग्रामसेविका सानिका पालव, भडगाव बुद्रुक पोलीस पाटील मंगेश सावंत, भडगाव खुर्द पोलीस पाटील तुकाराम अंब्रे, विनोद सावंत, विवेक कदम, कोमल पाटील, संजय आंबरे, संकेत सावंत, विघ्नेश घाडी, एकनाथ घाडी, अभय सावंत आदी उपस्थित होते













