कणकवलीतील हायवे सर्व्हिस रोडवरील खड्डे देतायत अपघाताला निमंत्रण

अपघातानंतर प्रशासन जागे होणार काय ? नागरिकांचा सवाल

कणकवली ( आनंद तांबे ) : कणकवली शहरातील नॅशनल हायवे चे सर्व्हिस रोड दुतर्फा खड्डेमय झाला आहे. शहरातील पटवर्धन चौकात तर भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीने केलेल्या निकृष्ट कामाचा फटका वाहनचालकांना बसत असून तात्काळ हे खड्डे पावसाळी डांबराने बुजविण्याची मागणी होत आहे. पटवर्धन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी बस स्थानक येथे सर्व्हिस रोड खड्डेमय झाला आहे. पटवर्धन चौकात पडलेले खड्डे पेव्हर ब्लॉक ने पावसाळ्यात सुरुवातीला बुजविण्यात आले.मात्र पेव्हर बसवलेल्या जागेपासून हे खड्डे आणखी मोठे झाले असून बसवलेले पेव्हर ही उखडून वर आले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यातच आर बी बेकरी समोर पडलेला भलामोठा खड्डा हा मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे.एखादा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आणि ठेकेदाराला सांगून खड्डे बुजवणार काय असा सवाल नागरिक विचारत आहेत.

error: Content is protected !!