श्रावणात रानटी गवारेड्यांचा वावर

शेतकरी वर्गात भयावह वातावरण

मालवण (प्रतिनिधी): श्रावण ता. मालवण येथे आठ ते दहा रानटी गवारेड्यांचा कळप श्रावण गावात जोगण व कुपेरी परिसरात ८ आँगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता वावर करताना दिसला. या रानटी गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या जीवाला धोका आहे. त्याची दखल वन अधिकाऱ्यांनी वेळेत घेऊन लोकांचे जीवाचं संरक्षण करावे. अशी जनतेची मागणी आहे. श्रावण व गवळीवाडी स्टॉप यांच्यामध्ये असलेल्या इडीच्या ओढ्यावरून हा कळप गवळीवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. अशी माहिती बेळणे पोस्ट चेकला असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यांनी आचर्‍याच्या दिशेने घरी जाताना पाहिले व हि माहिती पत्रकार गणेश चव्हाण यांना तेथेच दिली. या गवा रेड्यांपासून ग्रामस्थांनी सतर्क राहणे व काळजी घेण्याच्या दृष्टिने चव्हाण यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. रानटी गवारेडे सिंधुदुर्गात प्रत्येक गावागावात पोहोचल्याने, येथील जनजीवन भयभीत झाले आहे. महाराष्ट्र शासनाने या रानटी जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा यां प्राण्यांपासून सर्वसामान्यांचेही जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गांना जीवन जगणे असाह्य झाले आहे.

error: Content is protected !!