प्रतिनिधी (आचरा): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा चिंदर ग्रामपंचायत मध्ये 11 आँगस्ट पासून 15 आँगस्ट पर्यंत विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.
11 आँगस्ट रोजी संध्याकाळी 3 वाजता दहावी-बारावी उत्तीर्ण गुणवंताचा गुण गौरव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमातंर्गत चिंदर मधील जि. प शाळांन मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धानमध्ये नंबर मिळविलेले विद्यार्थी तसेच विविध परिक्षांनमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट प्रत्येक घरोघरी ध्वज फडकवणे.
14 आँगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहन, 8.30 वाजता शिलाफलकाचे अनावरण, 8.45 वाजता हातात पणती घेऊन पंचप्रण शपथ, 9 ते 10 मान्यवरांचा सत्कार, 10.30 ते 12 वृक्ष दिंडी व वृक्षारोपन(पालकरवाडी रोड) तसेच 15 आँगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहन व 10 वाजता ग्रामसभा असे कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी केले आहे.
चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची विविध उपक्रमांनी होणार सांगता












