सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस ठाणे परिसरात वृक्षा रोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांच्यासह पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस महिला, पुरुष कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी विनोद दळवी, बाळ खडपकर, दत्तप्रसाद वालावलकर, लवू म्हाडेश्र्वर, मनोज वारंग, संजय वालावलकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!