सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल येथे बालमवाडी येथे आपला sakkha भाऊ सचिन श्रीकांत भोसले याचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वामन उर्फ संतोष श्रीकांत भोसले याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला.याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. वामन भोसले याने आपला skkha लहान भाऊ सचिन भोसले 14 मार्च 2023 रोजी कसाल येथील राहत्या खोलीत लोखंडी सळीने वर्मी घाव घालून खून केला होता.या गुन्ह्यात आरोपी वामन याच्याविरोधात आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करून त्याला 14 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. 17 मार्चपासून आरोपी वामन हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सादर केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे मांडून हरकत घेतली. परिस्थितीजन्य, भौतिक, वस्तूजन्य पुरावे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपीने कलम 302 नुसार गुन्हा केल्याचे सिद्ध होण्याइतपत पुरावे असल्याने, आरोपीने केलेल्या गुन्ह्याची पूर्ण कल्पना त्याला होती, गुन्ह्या नंतर घटना उघडकीस येईपर्यंत तो मालवण मध्ये नातेवाईकांकडे होता याबाबत त्याच्याकडे स्पष्टीकरण नाही, स्वतःच्या sakkhya भावाच्या खुनाचे कृत्य आरोपीने पूर्ण विचारांती केलेलं असून जामीन मिळाल्यास आराेपी फिर्यादी, साक्षीदार यांच्या जीवितास, मालमत्तेस हानी पोचवू शकतो, आरोपीने गुन्हा केल्याचे त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याने, जामीन मिळाल्यास आरोपी न्यायालयाने दिलेल्या अटी शर्तींचे पालन करेल याची शाश्वती वाटत नाही. हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी वामन भोसले चा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.












