खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रा.पं.च्या वतीने “मेरी माटी मेरा देश ” या उपक्रमाचा शानदार शुभारंभ जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं. सदस्य गुरूप्रसाद शिंदे,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,संतोष पाटणकर,खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई,किरण कर्ले,मनाली होनाळे,शितीजा धुमाळे,अमिषा गुरव,दक्षता सुतार,खारेपाटण ग्रा.पं.चे ग्राम विकास अधिकारी जी.सी.वेंगुर्लेकर,खारेपाटण सिनियर कॉलेज चे प्राद्यापक वसीम सय्यद सर,प्रा.शिंदे सर, प्राध्यापिका सौ देसाई,कृषी सेवक सागर चव्हाण,खारेपाटण केंद्र शाळेच्या शा.व्य.स.अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,सुहास राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.यानंतर खारेपाटण सिनियर कॉलेज एन.एस. एस. विभागाचे विद्यार्थी व खारेपाटण केंद्र शाळेचे विद्यार्थी आणि पालक व ग्रामस्थ यांना खारेपाटण ग्रा.पं.च्या वतीने सामूहिक दीप प्रज्वलित करीत सामूहिक पंचप्राण प्रतिज्ञा देण्यात आली. यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला.
“मेरी माटी मेरा देश “उपक्रम अंतर्गत खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यावर मातीचे पूजन करून सर्वांनी मिळून भरलेल्या मातीच्या कलशाचा शुभारंभ खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खारेपाटण किल्ले परिसरात सुमारे ५० आंब्याच्या झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम देखील मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.यावेळी खारेपाटण ग्रा.पं.चे कर्मचारी व खारेपाटण सिनियर कॉलेजच्या एन एस एस विभागाच्या एकूण ४० विद्यार्थ्यांनी प्रा.वसीम सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक श्रमदान केले.
“भारत देशाबद्दल व इथल्या माती बद्दल सर्व नागरीकामध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी व आपले अधिकार आणि कर्त्यवाशी प्रमाणिक राहून बलशाली भारत घडवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण करुया.” असे भावपूर्ण उदगार तथा आवाहन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना काढले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले.
















