ग्रामपंचायत किंजवडे 15 ऑगस्ट रोजी 40 फुट उंच 6 बाय 4 चा ध्वज ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारणार

देवगड (प्रतिनिधी) : किंजवडे ग्रामपंचायतीने नुकतेच विवाह नोंदणी दाखला मिळण्यसााठी वृक्ष लागवडीची अट हि संकल्पना राबवून एक वेगळेपण निर्माण केले असतानाच आता स्वातंत्रय दिना निमित्त 15 ऑगस्ट रोजी 40 फुट उंच 6 बाय 4 चा ध्वज उभारुण ग्रामपंचायत कार्यालयासमोर फडकविण्यात येणार आहे. संपुर्ण ध्वजाचा खर्च हा लोकसहभागातून केला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वात उंच ध्वजारोहण करणारी देवगड मधील किंजवडे ग्रामपंचायत एक आदर्शवत ठरणार आहे.

किंजवडे ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम बनविण्याच्या दृष्टीकोनातून नाविन्यपुर्ण असे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. असेच सहकार्य गावाच्या विकासासाठी मिळत राहिले तर नक्कीच किंजवडे गाव हा राज्यामध्ये आदर्श गाव होण्यास वेळ लागणार नाही. असे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी सांगितले आहे. या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवराज राठोड काम पाहत आहेत. यापुर्वी त्यांनी बापर्डे गाव स्मार्ट ग्राम बनवून व अनेक शासनाच्या विविध योजना राबवून अग्रेसर राहून अनेक पारितोषिके मिळविली आहेत. याच प्रमाणे आता किंजवडे गावही अनेक शासनाच्या उपक्रमातून अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

error: Content is protected !!