आ. नितेश राणेंनी कणकवलीतील सेल बंद करून आम जनतेच्या आनंदावर विरजण घातले
मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : ब्रँडेड कपडे घालणाऱ्याना आम जनतेची समस्या कशी कळणार ? कणकवलीतील अरविंद साडी सेंटर च्या बिग सेल मध्ये अगदी माफक दरात कणकवली च्या बाजारपेठेतील दुकांनांपेक्षा स्वस्त दरात वस्तू मिळणार होत्या.महागाई च्या काळात स्वस्त दरात जनतेला वस्तू घेता येणार होत्या. ज्या भाजपा पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधींनी त्या सेल चे उदघाटन केले, नगरपंचायत ने नाहरक दाखला दिला.आणि शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी आमदार नितेश राणेंकडे सेल बंद करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांचा फायदा बघून स्थानिक आम जनतेला होणार आर्थिक फायद्याआड येणारे आमदार नितेश राणे हे पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. श्रावण महिन्याच्या तोंडावर जनतेला महागाई भडकली असताना अगदी अल्प दरात खरेदी चा आनंद घेता येणार होता, त्या आनंदावर आमदार नितेश राणेंनी विरजण घातल्याची टीका उपरकर यांनी केली.












