.
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर घाडीवाडी रस्त्यावर मोरी खचून त्यावर भलेमोठे खड्डे पडून अत्यावश्यक गरजेसाठी रिक्षा जाणेही कठीण झाले होते , त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन आज स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून बुजवले. नेरूर ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके , संतोष कुडाळकर , निलेश घाडी , रवी घाडी संदिप वालावलकर , श्री. पणदूरकर , अशोक नेरुरकर किशोर नाईक यांनी श्रमदान करून भलेमोठे खड्डे बुजवले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सदर खचलेल्या मोरीसाठी पूर व आपत्ती विभागाकडे १५ लाख रुपये निधीची मागणी केली आहे , तसेच घाडीवाडी रस्त्यासाठी नागरी सुविधामधून १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती डागडुजी करत आज रस्त्यावरील खड्डे आम्ही बुजवले आहेत. सदर रस्त्याचे काम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल. या कामी आमदार वैभव नाईक यांनी विशेष लक्ष घातले आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके यांनी दिली.
















