कणकवली (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या 4 रेल्वे स्टेशन सुशोभीकरण कामांचे स्थानिक पातळीवर भूमिपूजन केवळ भाजपा नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडीत माजी मंत्री प्रवीण भोसले असतानाही भाजपा पदाधिकाऱ्यांकडून भूमिपूजन करण्यात आले. जनतेच्या पैशातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन केवळ भाजपा नेत्यांकडून करवून घेऊन हा भाजपाचाच कार्यक्रम असल्याचे भासविण्यात आल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.निविदा जाहीर न करता ही उदघाटने करण्यात आली. कुडाळ रेल्वे स्टेशन मध्ये उदघाटन करताना माजी खा. निलेश राणेंनी विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असे म्हटले.स्वतः खासदार आणि वडील 25 वर्षे मंत्री आणि पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला नाही असेच निलेश राणेंना म्हणायचे आहे काय ? असा सवाल उपरकर यांनी केला. रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना त्यापुढील खड्डेमय रस्त्यांचे काय ?. हे खड्डे कधी बुजवणार ? पालकमंत्र्यांनी अलीकडे नॅशनल हायवे ची पाहणी केली. एकेरी वाहतूक सुरू करणार असे पालकमंत्री चव्हाण म्हणाले.पण याच एकेरी लाईन वर रस्त्याला तडे गेले आहेत. असेही उपरकर म्हणाले.













