कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठा च्यावतीने आयोजित ५६ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २३-२४ दिनांक १० ऑगस्ट रोजी आनंदीबाई राव राणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीमधील भारतीय सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, भारतीय समूह गीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकनृत्य, वक्तृत्व गट (हिंदी), कथाकथन (मराठी), कथाकथन (हिंदी), मिमिक्री, कोलाज या कला प्रकारामध्ये कणकवली कॉलेज, कणकवलीच्या विद्यार्थ्यानी बाजी मारली. एकूण १० कलाप्रकारांची विद्यापीठ पातळीवर निवड झाली आहे.
५६ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवा मध्ये कणकवली कॉलेज, कणकवलीच्या ४४ विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या कला प्रकारा मध्ये सहभाग घेतला होता. या विभागीय युवा महोत्सवाच्या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यानी प्रति वर्षाप्रमाणे याही बाजी मारली आहे. कणकवली महाविद्यालयातील सर्व कलावंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व प्राध्यापक वृंद या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. सौ.राजश्री साळुंखे सचिव श्री विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.













