कुडाळ डेपो मॅनेजरच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत व्यक्त केला निषेध
कुडाळ (अमोल गोसावी) : एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक आणि उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी आज कुडाळ एसटी डेपोत् जात अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि ऐनवेळी रद्द होणाऱ्या बस फेऱ्या या विरोधात उपस्थित सहाय्यक वाहतूक नियंत्रक पल्लवी मोर्ये आणि शिवाजी राठोड यांना जाब विचारत गलथान कारभाराचा समाचार घेतला. आणि डेपो मॅनेजर संदिप पाटील यांच्या रिकामी खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.
यावेळी ते म्हणाले कि वेळोवेळी शालेय फेऱ्या रद्द होणे आणि प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होणे या गोष्टी प्रकर्षाने पुन्हा पुन्हा होत आहेत त्याला हे सध्याचे असलेले ढिसाळ नियोजन आणि अधिकाऱ्यांची अनुपस्थिती जबाबदार आहे. आज अचानकपणे सकाळी सवानउ वाजता सुटणारी कवठी एस टी , 08:10 मिनिटांनी सुटणाऱी वेंगुर्ला तसेच साडेअकरा वाजता सुटणारी सावंतवाडी या तीन फेऱ्या अचानक रद्द झाल्या त्यानंतर आपल्याकडे याबाबत तक्रारी आल्या म्हणून आज आम्ही कुडाळ एसटी डेपो मध्ये जाब विचारण्यासाठी आलो असता या ठिकाणी एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही. ना डेपो मॅनेजर, ना एडब्ल्यूएस , ना एटीएस यासह इतर सक्षम अधिकारी याठिकाणी उपस्थित नाहीत. याबाबत डी सी साहेब यांच्याशी संपर्क केला असता मशीनच्या ट्रेनिंग साठी डेपो मॅनेजर व इतर चार अधिकाऱ्यांना बोलावल्याचे सांगितले अशावेळी डेपो मॅनेजर यांनी बाहेर पडताना याठिकाणी सक्षम अधिकारी ठेवणे गरजेचे होते दरम्यान आजचे हजेरी बुक पाहता एकाही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्यांची हजेरीची किंवा रजेची अधिकृत नोंद दिसत नाही ही धक्कादायक बाब उघड झाली.
काही दिवसांपुर्वी आमच्या शिष्टमंडळाची बैठक डीसी साहेब यांच्या सोबत झाली असता त्यांनी आम्हाला असे अधिकृत लेखी पत्र दिले आहे की शालेय मुलांच्या फेरी पैकी जर एखादी ट्रीप कॅन्सल झाली असेल आणि त्यामुळे शालेय मुलांना शाळेत पोचता आले नसेल तर त्या संबंधित डेपो मॅनेजर यांच्यावर आपण सक्षमरित्या कारवाई करू आज सव्वानऊ च्या कवठी गाडीसाठी शालेय मुले वाट बघत होती पण ही फेरी अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर झाला त्यामुळे इतर प्रवाशांचे नुकसान झाले आहे यासोबत इतर फेऱ्याही रद्द झाले आहेत त्यामुळे आता डी. सी. साहेब कुडाळ डेपो मॅनेजर यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल अनुप नाईक यांनी उपस्थीत केला. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नाहीत त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी आलो तर कोणाशी चर्चा करायची हा प्रश्न अधोरेखित होतो. अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.












