कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे गुरुवार दिनांक १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी गुरुवर्य पुरस्कृत, तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
*या स्पर्धेसाठी कणकवली तालुक्यातील जवळपास ३६ शाळांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, प्रत्येक गटातून एक विद्यार्थी संघ प्रशालेतून सहभागी झालेले होते. या देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेसाठी संगीताची आवड असणारे जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक संगीत प्रेमी, शिक्षक,मुख्याध्यापक, वादक रुंद, पत्रकार बंधू , पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. ही स्पर्धा कणकवली तालुक्यातील संगीत कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देशभक्तीपर गीतांची मेजवानी ठरली, प्रत्येक शाळेने समूह गीतांची पर्वणी सादर करत “याची देही याची डोळा, ऐसा देखिला देशभक्ती गीतांचा सोहळा” उत्तम, दर्जेदार, बहारदार सादरीकरण करत स्पर्धक संघांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
या स्पर्धेचे आयोजन दोन दिवशी करण्यात आलेले होते पहिल्या दिवशी ही स्पर्धा प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी घेण्यात आली. परीक्षक म्हणून अभिषेक शिरसाट बुवा तसेच संगीत विशारद प्रफुल्ल रेवणकर तर दुसऱ्या दिवशी माध्यमिक गटात शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्पर्धा घेण्यात आली,परीक्षक म्हणून संगीत विशारद वैभव मांजरेकर व सन्माननीय श्री प्रफुल्ल रेवणकर यांनी या दोन दिवशी देशभक्तीपर समूह गीतांचे परीक्षण करून पारदर्शक निकाल दिला
पहिला गट पहिली ते चौथी यासाठी प्रथम- पारितोषिक विजेता संघ- सेठ न.म.विद्यालय खारेपाटण. सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प ,द्वितीय- जि. प.पू. प्रा. शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम गुलाब पुष्प, तृतीय- जि.प.पू.प्रा.शाळा दिगवळे नंबर-१. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प.उत्तेजनार्थ- जि.प. प्रा. शाळा कुर्ली वसाहत फोंडाघाट, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम,गुलाब पुष्प
पाचवी ते सातवी हा दुसरा गट प्रथम- वामनराव महाडिक हायस्कूल तळेरे, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, रोख रक्कम, गुलाब पुष्प. द्वितीय- शेठ न.म.विद्यालय खारेपाटण सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प तृतीय- विद्या मंदिर हायस्कूल कणकवली, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प. उत्तेजनार्थ- प्रथम, जि. प. प्रा.शाळा नागवे -१ द्वितीय,सरस्वती नांदगाव हायस्कूल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम,गुलाब पुष्प
तिसरा गट आठवी ते दहावी यासाठी प्रथम पारितोषिक- सेठ न.म.विद्यालयख खारेपाटण . सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, रोख रक्कम,गुलाब पुष्प.द्वितीय- वामनराव महाडिक हायस्कूल तळेरे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प.तृतीय- सरस्वती हायस्कूल नांदगाव, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प.उत्तेजनार्थ- प्रथम,माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल. द्वितीय, शिवडाव हायस्कूल शिवडाव, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, रोख रक्कम,गुलाब पुष्प, तसेच प्रत्येक शाळेच्या सहभागी संघाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सतीश सावंत (अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई) शिवाजी जगन्नाथ सावंत ( सरचिटणीस, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई) सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत, सर्व शालेय समिती सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमंत दळवी ( प्रशाला मुख्याध्यापक/ प्राचार्य) यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद मसुरकर (सहा. शिक्षक माध्यमिक) यांनी केले.












