स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत तरंदळे येथे ध्वजाराेहण सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामपंचायत तरंदळे येथे स्वातंत्र दिन माेठ्या उत्साहात संपन्न झाला.ध्वजारोहण सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.अशीच उपस्थिती इतरही कार्यक्रमांना दर्शवावी अशी सरपंच सुशिल कदम यांनी इच्छा व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन सावंत व माजी सरपंच तंटा मुक्त अध्यक्ष जयसिंग नाईक यांनी आपले विचार मांडले.यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली.सरपंच सुशिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.ते पुढे म्हणाले युवा तरुणांनी पुढाकार घेऊन तरंदळे गावच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.गावा मध्ये उद्योजक निर्माण केले पाहिजेत.तसेच आजची तरुण पिढी वॉट्स् अॅप, फेसबुक ह्यांसारख्या प्रसार माध्यमांच्या बळी पडत आहेत.व्यसनाधीन हाेत आहेत.म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी उपस्थित नागरिकांना 76 व्या स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य तेजस सावंत,संजय परब,दीपक घाडी,ग्रामपंचायत सदस्य सुनिल दत्त जाधव,नेहा घाडी गावकर,संजना राणे,वैशाली घाडी गावकर,माजी सरपंच सुधीर सावंत,तंटामुक्त अध्यक्ष जयसिंग नाईक,उप तंटामुक्त अध्यक्ष सत्यवान राणे,ग्रामसेवक.रेश्मा पालकर, माजी सदस्य. देवा रावले,सामाजिक कार्यकर्ते.अमित सावंत,सागर सावंत,मधुसूदन सावंत,शरद सावंत,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अभय सावंत,शामू गावकर,वनिता कदम गावातील आशा ताई,मुख्याध्यापक साै.कुलकर्णी, साै.लोकरे,शिक्षक वर्ग,अंगणवाडी सेविका, मदतनीस,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला वर्ग आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी सत्कार मध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत कडून सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य सुनिल दत्त जाधव यांच्या संकल्पनेतून बलून सजावट करण्यात आली होती.विशेष करून त्यांनी खूप मेहनत घेतली.त्यांना मदत करण्यासाठी अविनाश जाधव,अभय सावंत,राहुल कदम,प्रमोद जाधव,प्रणय जाधव उपस्थित होते.तसेच साऊंड व्यवस्था पुरवली ते ग्रामपंचायत सदस्य सुनिल दत्त जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी यासर्वांचे सरपंच सुशिल कदम आभार मानले.

error: Content is protected !!