तरेळे (स्वप्नील तांबे) : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत ओझरम च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन ओझरम ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते. यावेळी ओझरम गावातील माजी सैनिक वसंत राणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शिलाफलकाचे अनावरण सरपंच समृद्धी राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आज भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. सकाळी ८ वाजता ओझरम ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण सरपंच समृद्धी राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच वैद्यही मधुसूदन राणे हिने स्कॉलरशिपमध्ये सिंधुदुर्ग जिल्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सरपंच समृद्धी राणे, उपसरपंच प्रशांत राणे, ग्रामसेवक जी. वाय. बोडेकर तसेच रामपंचायत सदस्य सुधाकर राणे,दिलीप तांबे,विनया राणे,रुपाली धुरी, विशाखा राणे, पोलीस पाटील तुषार तांबे, माजी सैनिक वसंत राणे,निवृत्त पोलीस लक्ष्मण राणे, गजानन राणे, माजी सभापती विनायक राणे तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका ओझरम शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक विध्यार्थी पालक आणि ओझरम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















