वायंगणी ग्रामपंचायतीचा स्तृत्य उपक्रम
आचरा (प्रतिनिधी): अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा “मेरी मिट्टी मेरा देश” अभियानातंर्गत आणि 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिन यांचे औचित्य साधत मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेने संपन्न झाला. ग्रामपंचायत हाँल येथे आयोजित करण्यात आलेली हि स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात घेतली गेली, पहिली ते चौथी गटात श्रेयांक कमलेश बांदेकर याने प्रथम क्रमांक तर संकल्प प्रदिप दुखंडे याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. पाचवी ते सातवी गटात लविना सावंत हिने प्रथम तर कैवल्य अजय सावंत याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. आठवी ते दहावी गटात गौरी गराटे प्रथम तर मंजिरी घाडीगांवकर हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत वायंगणी नं 1शाळा, कालावल शाळा, ठाणेश्वर शाळा, ज्ञानदिप माध्यमिक विद्यालय वायंगणी या शाळांच्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिक्षक म्हणून शिक्षक- प्रभा समिर बांवकर व प्रकाश पेडणेकर यांनी काम पाहिले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच रुपेश पाटकर, उपसरपंच अँड. समृद्धी आसोलकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन रेडकर, संजना रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, अर्चना सावंत, शामसुंदर नाईक, ग्रामस्थ, शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार उपसरपंच अँड. समृद्धी आसोलकर यांनी मानले.












