आ.नितेश राणेंनी नांदगाव नळपाणी योजनेसाठी मिळवून दिला स्वतंत्र ट्रान्सफार्मर

सरपंच भाई मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन ; नांदगांववासीयांना होणार सुरळीत पाणीपुरवठा

कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा नियोजन च्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्या सक्षम पाठपुराव्यामुळे नांदगाव नळपाणी योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर करून नांदगाव वासियांचे होणारी गैरसोय दूर केली. अंदाजे रक्कम सुमारे ०८.५० लाख रुपये या ट्रान्सफॉर्मर साठी खर्च करण्यात आले. यामुळे नांदगाव नळ पाणी योजनेचे पाणीपुरवठा यापुढे सुरळीत होईल. यामुळे आ. नितेश राणे यांचे नांदगाव वासियांनी जाहीर आभार मानले. या स्वतंत्र नवीन ट्रान्सफॉर्मर चे उद्घाटन नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, माजी पं. स. सदस्य व महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत तांबे, रमीजान बटवाले, संतोष बिडये, माजी उपसरपंच निरज मोरये, वाळके सर, राजू तांबे, संतोष जाधव, कमलेश पाटील, यासीन मास्के, यासीन पाटणकर गफार बटवाले तोसीम नावळेकर व भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!