रवींद्र उर्फ बाळा जठार व दिलीप तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त
कणकवली (प्रतिनिधी) : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ १२३८) योजनेंतर्गत विकासकामांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडील शासन निर्णय दि. १४ ऑगस्ट २०२३ अन्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार ‘तळेरे स्मशानभूमी रस्ता खडीकरण -डांबरीकरण करणे’ या विकास कामासाठी राज्य शासनाने १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सदरच्या विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त व बांधकाम विभागाचे माजी सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार व कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नामुळे सदरच्या विकास कामासाठी १० लक्ष रुपयांच्या निधीस राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे स्थानिकामध्ये समाधानाची भावना आहे.












