कणकवली (प्रतिनिधी): युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने आयोजित मोफत मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी अशोक कांबळे,प्रफुल्ल काणेकर,संजय सावंत, राजू देसाई,राजश्री पवार, मयुरी मुंज, राजू सापळे, नितिन गावकर, मीनल पवार, प्रियाली कोदे आदी मान्यवर उपस्थित होते . सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ ते शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात विवीध प्रकारची मेहंदी, अंब्रोडरी व ग्लास पेंटींग यांचे देण्यात आले.या प्रशिक्षण वर्गात १२६ महिला सहभागी झाल्या, सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले . मार्गदर्शक प्रियाली सुरेंद्र कोदे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सर्व महिला उत्साहाने व आनंदाने सहभागी झाल्या. उपस्थित महीलांमधून नम्रता काणेकर, सृष्ठी शिरसाट व श्रद्धा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.मनोगतात उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना आयोजक संदेश सावंत आणि संजना सावंत यांचे आभार मानले… संदेश सावंत यांनी मनोगतात महिलांनी मागे न राहता उद्योग व्यवसाय करावे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांचा फायदा करुन घ्यावा असे सांगितले.तसेच उद्योग व्यवसायसाठी आवश्यक अर्थ पुरवठा बँकामार्फत करण्यासाठी मदत करण्याचे जाहीर केले.लवकरच कनेडी येथे डेअरी सुरू करणार असे सांगितले. गणपती नंतर महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. संजना सावंत यांनी सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.. पंचक्रोशीतील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित मेहंदी ,ऍम्ब्रॉडरी, ग्लास पेंटिंग प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न












