“महीला बचत गटांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविली पहिजे” – अजित गोगटे
देवगड (प्रतिनिधी): “आपल्या कोकणातील महीला बचत गटांनी स्वताकडील उत्पादित व्यवसायचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग करून त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार माजी आमदार अजित गोगटे यांनी आत्मा,उमेद व माविम यांचे संयुक्त विद्यमाने देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या रानभाज्या महोत्सव उदघाटन प्रसंगी बोलताना काढले. मा.आमदर अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रानभाज्या महोस्तवा अंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच रानभाज्याची व खाद्यपदार्थांची विक्री आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रानभाज्याचे औषधी गुणधर्म, रोजच्या आहारात त्याचा वापर व त्याचा आरोग्यसाठी असणारा फायदा तसेच मार्केटिंग व्हॅल्यू इत्यादी बाबत कृषी पर्यवेक्षक सावंतवाडीचे यशवंत गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाच्या अनुशांगाने आत्मा योजना कृषी उपसंचालक परिट साहेब,जिल्हा समन्वयक माविमचे काळे साहेब यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला देवगड तालुका पोलिस निरीक्षक बगळे,अन्नपूर्णा लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा उषा:कला केळुस्कर,मविम चे व्यवस्थापक अस्मिता जाधव, संतोष किंजवडेकर,उमेदचे संजय पवार व संगीता बांदेकर आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत श्री स्वामी समर्थ महिला बचत गट कुणकेश्वर यांना प्रथम क्रमांक व सुनीता पाटील जामसंडे यांना द्वितीय क्रमांक तर स्नेहल राणे देवगड यांना तृतीय क्रमांक मिळाला.तसेच प्रीती वाडेकर सडेवाडी व स्फूर्ती स्वयंसहायता समूह बचत गट राहाटेश्वर यांना उत्तेजनार्थ म्हणून घोषित करून त्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण अजित टाककर, माणगावकर व पारकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केले.तर सूत्रसंचालन बी टी एम – निकेतन राणे यांनी केले. या रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोस्तवात मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाच्या सदस्य तसेच कृषी विभागचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












