पोलीस घटनास्थळी दाखल ; मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली गणपती साना या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? हा यामागे घातपात होता का? याची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, सदर तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. दरम्यान या तरुणाच्या गळ्यामध्ये कापडी फडक्या सदृश्य वस्तू आढळली असून, त्यामुळे याचा तपास कणकवली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पोलीस सतर्क झाले असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी व अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान त्या तरुणाचा मृतदेह कातकरी समाजातील काहींनी नदीलगत पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात नेला आहे.













