शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ लढविणे आणि रिक्षा सजावट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना उबाठा शाखा कनेडीच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ लढविणे आणि रिक्षा सजावट स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी कनेडी येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख सतीश सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली असून विजेत्यांना रोख रक्कम पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे. नारळी पोर्णिमेनिमित्त नारळ लढविणे स्पर्धा सकाळी 10 :00 वा संपन्न होणार आहे. नारळ लढविणे स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु 3 हजार, द्वितीय पारितोषिक रु 2 हजार, तृतीय पारितोषिक रु 1 हजार आहे. स्पर्धकांना स्पर्धेसाठी लागणारे नारळ शाखेमार्फत पुरविले जातील. नारळी पोर्णिमेनिमित्त रिक्षा सजावट स्पर्धा सकाळी 11 वाजता होणार आहे. रिक्षा सजावट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु 3 हजार, द्वितीय पारितोषिक रु 2 हजार, तृतीय पारितोषिक रु 1 हजार आहे. अधिक माहितीसाठी कुणाल सावंत मोबा 940394603 ,सुदर्शन रासम मोबा. 404746405, सचिन खंदारे मोबा 9423446691 वर संपर्क साधावा. इच्छुकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, युवासेना अल्पसंख्याक सेलउपजिल्हाप्रमुख बेनी डिसोझा यांनी केले आहे.

error: Content is protected !!