सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचा पुढाकार
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील महिलांना देवदर्शन घडावे या हेतूने तरंदळे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांच्या पुढाकारने श्रावणी सोमवार चे औचित्य साधून तरंदळे गावातील महिलांना दक्षिण काेकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे घेवून जात देवदर्शन घडवून आनले.
या देवदर्शन यात्रेची सुरुवात तरंदळे गावचे जेष्ठ नागरीक शामु गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.यावेळी तरंदळे सरपंच सुशिल कदम उपस्थित हाेते. यावेळी ते म्हणाले अशाच प्रकारचे सामाजिक कार्य अमित सावंत यांच्या हातून पुन्हा घडू दे असे काैतुकाेद्गार काढले.तसेच सरपंच सुशिल कदम यांनी अमित सावंत व गावातील महिलांना शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत व गावातील महिलांना शुभेच्छा देण्यासाठी सरपंच माजी सरपंच सुधीर सावंत,शामु गावकर,सुजाता मुणगेकर,अशोक कदम,अर्पिता घाडीगावकर व गावातील महिला उपस्थित होत्या.
















