पेंडुर जिल्हा परिषद विभागात युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

चौके ( अमोल गोसावी ) : सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी कट्टा बाजारपेठ येथे संपन्न झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पेंडूर विभागीय बैठकीमधे विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नवीन पदाधिकऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सूचना व अडचणी समजून घेण्यात आल्या यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, युवासेना समन्वयक मंदार ओरासकर ,युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, अक्षय रेवंडकर , महिला विभागप्रमुख लता खोत, विभागप्रमुख कमलाकर गावडे ,उपविभागप्रमुख उमेश प्रभू आणि शिशुपाल राणे , दर्शन म्हाडगुत, बाबू टबुलकर , वंदेश ढोलम, देवदास रेवडेकर , शेखर रेवडेकर, संदीप सावंत , गणेश गाड , हर्षद मोरजकर , जगदीश मोरजकर , राजु परब ,प्रसाद दळवी , बाळा पेडणेकर , किशोर भगत, विजय धामापुरकर , भिवा तळगावकर यांसह विभागातील सर्व शाखाप्रमुख आणि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते यावेळी सर्वांच्या एकमताने युवासेना पेंडुर विभागप्रमुख पदी वंदेश ढोलम, शिवसेना कट्टा शाखाप्रमुख पदी गणेश गाड , उपशाखाप्रमुख पदी हर्षद मोरजकर, शिवसेना काळसे शाखाप्रमुख पदी चंद्रकांत उर्फ पप्या राऊळ युवासेना कट्टा शाखाप्रमुख पदी भूषण ढोलम, सिद्धार्थ हिरवे , युवासेना पेंडूर शाखाप्रमुख पदी संदीप सावंत या सर्वांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

error: Content is protected !!