ऍक्सिस बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आठवडाभरात लागणार मार्गी
मुंबई (प्रतिनिधी): ऍक्सीस बँक हेड ऑफिस वरळी येथे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कामगारांची गेली पाच वर्ष रखडलेली पगारवाढ व हक्कचा मिळणारा D.A. बंद करण्यात आल्यामुळे आमदार नितेश राणेंकडून बॅंकेला ईशारा देण्यात आला. व्यवस्थापनाकडून आठवड्याची वेळ मागून घेण्यात आली. सर्व प्रलंबित प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यात येणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले. यावेळी सरचिटणीस प्रवीण नलावडे, ऍक्सिस बँक युनिट पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











