कलाकार मानधन जिल्हा समिती सदस्य पदी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील शैलेश जामदार यांची निवड

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशीनुसार जिल्हा कलाकार मानधन समिती गठीत

वेंगुर्ले (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी भाजपा चे कणकवली ग्रामीणचे मंडल अध्यक्ष व जिल्ह्यातील नामांकित डबलबारी बुवा संतोष कानडे यांची निवड करण्यात आली असून पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व वेंगुर्ले भाजपा सांस्कृतिक आघाडी चे अध्यक्ष व हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार शैलेश जामदार ( वेतोरे ) यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. गायन व मिमिक्री क्षेत्रात काॅलेज जीवनापासूनच पारंगत असलेले व सध्या ” अनिता कराओके ” च्या माध्यमातून गोवा व महाराष्ट्रात स्टेज शो करत असलेल्या एका जातिवंत कलाकाराला समिती मध्ये संधी मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!