कनेडी हायस्कुलला दिनेश बोभाटे यांस कडून दोन लॅपटॉप भेट

कणकवली (प्रतिनिधी): सध्याच्या डिझिटल युगात सर्व ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो. त्याच शिक्षण क्षेत्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात केला जातो.मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणाका पासून वंचित राहतात.आपल्या ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांची गरज ओळखून नाटळ गावचे सुपुत्र,शिवसेना स्थानिक लोकाधिकार समिती संघटक सचिव,विमा कर्मचारी सेना सरचिटणीस,सार्थ प्रतिष्ठान सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या पदावर काम करणारे नाटळ गावचे सुपुत्र दिनेश बोभाटे आणि त्यांचे कुटुंबीय यांचं कडून जवळ जवळ एक लाख रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप प्रशालेला भेट स्वरूपात देण्यात आली. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने सार्थ प्रतिष्ठान या संस्थे मार्फत मुंबईतील विविध  हॉस्पिटलना मदत सुद्धा केलेली आहे. दिनेश बोभाटे यांनी दाखवलेल्या दातृत्वा मुले मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  या कार्यक्रमाला कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सन्मा.सतीशजी सावंत,सरचिटणीस शिवाजी सावंत, खजिनदार प्रकाश सावंत, सदस्य नागेश मा.सावंत, प्रशालेचे चेअरमन आर.एच. सावंत सर,खजिनदार गणपत अ.सावंत, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा.बयाजी बुराण सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!