भाजपचा डाव उधळण्यासाठी ‘इंडिया’ची मोठी खेळी

बैठकीला देशातील 28 पक्षाचे नेते एकत्रित जमणार

ब्युरो न्युज (मुंबई) : आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींचे परिणाम केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर होणार आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. इंडिया आघाडीच्या निवडणूक रणनीतीपासून ते आघाडीचा लोगो आणि संयोजकपदावर या बैठकीतच निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर इंडिया आघाडीकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या लोगोचे प्रकाशन होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच उद्या इंडिया आघाडीची सकाळीच महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात इंडिया आघाडीच्या पुढच्या स्टॅटेजीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला एकूण 28 पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याने या बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!