जुगाराची जाहिरात | सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन

ब्युरो न्युज (मुंबई) : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रकरणात इशारा दिल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केलं आहे. बच्चू कडू त्यांच्या कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर जमले होते. याप्रकरणी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवण्याचीही घोषणा बच्चू कडू यांनी केली होती. सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी याधी दिला होता.

error: Content is protected !!