ग्रामीण जीवन उन्नती उमेद अभियान अंतर्गत येणाऱ्या

क्रांतिज्योती ग्रामसंघ खारेपाटणचा ५ वा वर्धापन दिन उस्ताहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन उन्नती उमेदअंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटाच्या क्रांतिज्योती ग्रामसंघ खारेपाटण यांचा ५ वा वर्धापन दिन नुकताच खारेपाटण हायस्कूलच्या सभागृहात खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. श्रीम.जागृती पोटले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ग्रामसंघाच्या वतीने महीलांसाठी रानभाज्या व पाककला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये एकूण २८ महिलानी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक श्रध्दा पाटील दुतिय क्रमांक नलिनी कर्ले तृतीय क्रमांक प्राची कांबळी तर उत्तेनार्थ म्हणून अंजली कुबल व दिप्ती धुमाळे या महिलांनी स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविले. तसेच यावेळी महिलांचे विविध खेळ घेण्यात आले.यामध्ये अंजली कुबल व गौरी शिंदे या विजेत्या ठरल्या. या स्पर्धेचे बक्षीस आकर्षक साडी खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला खारेपाटण मधील एकूण २० बचत गट समूहातील महिला सहभागी झाल्या होत्या. तर या कार्यक्रमाला प ग्रा.पं. सदस्या क्षितिजा धुमाळे,मनाली होनाळे,आस्थाली पवार तसेच डॉ. उज्वला येळकोटे व कथक नुत्य शिक्षिका सौ.वर्षा गोवळकर, शबाना लांबे,सी आर पी – सारिका वारंगे,सायली तुरळकर श्रद्धा जाधव, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.तर उमेदच्या अन्न,आरोग्य, पोषण व स्वच्छता या कृतीसंगमा अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी डॉ.उज्वला येळकोटे मॅडम यांनी ४० वयाच्या महिलांचे ‘आरोग्य व आहार ‘ यावर मार्गदर्शन केले. तर आस्थाली पवार यांनी ‘सॅनिटरी नॅपकिन निवड व वापर’ याविषयी महिलाना महिती दिली.तर खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी ‘जलजीवन मिशन व ग्राम स्वच्छता’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रा.प.सदस्य सौ.मनाली होनाळे व शीतीजा धुमाळे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक वृषाली दरपे यांनी केले.व सूत्रसंचालन आस्था पाटणकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत खारेपाटण व बचत गटातील सर्व महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले .

error: Content is protected !!